शेलद: मुठेवाडी अंगणवाडी केंद्रातील सेविकांचे ग्रामस्थांकडून कौतुक
शेलद(News): मुठेवाडी [शेलद] क्रमांक-२३ येथे ३ वर्षापर्यंत ते ६ वर्ष बालकांसाठी अंगणवाडी केंद्र चालविले जाते. या अंगणवाडी केंद्रात बालकांसाठी विविध असे उपक्रम राबविले जातात तसेच गरोदर महिलांसाठी मार्गदर्शन व अमृत आहार पुरविला जातो. या अंगणवाडी केंद्रात विद्यर्थ्याना सकस पोषण आहार वेळोवेळी पुरविला जातो. येथील बालकांना संस्कार व शिस्त चांगल्या प्रकारे दिली जाते. नुकतेच गरोदर महिलांसाठी स्वच्छता अभियान राबविले गेले.
या अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका हिरा मारुती भवारी, अंगणवाडी मदतनीस सुमन शंकर धराडे, गरोदर महिलांसाठी अमृत आहार पुरविणाऱ्या लता मनोहर घिगे यांचे मुठेवाडी ग्रामस्थांकडून प्रशंसा केली जात आहे. त्यांच्या कार्याचे गावातून कौतुक होत आहे.
अंगणवाडी शालेय पोषण आहार खाताना व श्लोक बोलताना बालक पहा व्हिडियो –
Website Title: News Muthevaadi anganwaadi Center