अकोले: १३ जुगारयांसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
अकोले: सरकारने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखनासाठी केलेल्या सरकारी आदेशाचे उल्लंघन करून बेलापूरमध्ये तीरट जुगार खेळताना १३ जण मिळून आले. जुगारयांसह पोलिसांनी दोन चार चाकी व ९ मोटारसायकलीसह ५ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
अकोले तालुक्यातील बेलापूर गावात पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे, उपनिरीक्षक दीपक ढोमणे, पोलीस कर्मचारी विठ्ठल शरमाळे, कुलदीप पर्बत यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे बाळासाहेब अशोक फाफाळे यांच्या घराच्या आडोशाला असलेल्या गाईच्या गोठ्यात छापा टाकून तेथे जुगार खेळणाऱ्या मारुती विठ्ठल तांबे, नवनाथ बन्सी शिंगोटे, बाळासाहेब म्हातारबा कारकूटे, मुरलीधर सखाराम इंगळे, विनायक रामचंद्र नलावडे, समीर सुरेश सोडकर, देविदास मारुती हांडे, प्रभाकर वसंत डोंगरे, प्रशांत नंदकुमार हांडे, जयसिंग दामू शिंगोटे, बाळासाहेब अशोक फाफाळे, सचिन दत्तात्रय शेलार यांच्यासह आणखी अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Website Title: News gamblers along with Rs 5 lakh crime reg