Home अकोले अकोले: बैल दुसऱ्या शेतकऱ्याच्या बांधावर गेल्याने मारहाण, गुन्हा दाखल

अकोले: बैल दुसऱ्या शेतकऱ्याच्या बांधावर गेल्याने मारहाण, गुन्हा दाखल

अकोले: अकोले तालुक्यात पिंपळगाव नाकाविंदा येथे बैल दुसऱ्याच्या बांधावर चरण्यास गेला असता तरुण शेतकऱ्यास मारहाण झाल्याची घटना काल ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोले तालुक्यातील नाकविंदा शिवारात शेतकऱ्याचा बैल चरता चरता दुसऱ्या शेतकऱ्याच्या बांधावर गेला याचा राग धरून बैल चारणारा शेतकरी तरुणास चार जणांनी लाथाबुक्क्यांनी लाकडी मारहाण करण्यात आली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. यामध्ये शेतकरी प्रमोद किरण गायकवाड वय २४ जखमी झाला.

याप्रकरणी प्रमोद गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नारायण लक्षमण मेंगाळ, त्रिंबक नारायण मेंगाळ, देवराम नारायण मेंगाळ, गणेश नारायण मेंगाळ सर्व रा. पिंपळगाव नाकाविंदा यांच्याविरोधात अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Website Title: Crime News farmer’s dam and was beaten Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here