नागरिकत्व कायदा लागू न करायला मुख्यमंत्र्यांच्या बापाचं राज्य आहे का?: आशीष शेलार
मुंबई (News): नागरिकत्व संशोधन कायदा लागू झाल्यास हिंदू व मुस्लीम अशा दोघांनाही नागरिकत्व सिद्ध करण्यात खूपच अडचणी येऊ शकतात. त्यामुळे मी असे होऊ देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. या विधानानंतर सीएए लागू न करायला मुख्यमंत्र्यांच्या बापाचं राज्य आहे का?, अशी टीका भाजपचे नेते आशीष शेलार यांनी मुख्यमंत्री यांच्यावर केली आहे. शेलार यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला आहे. नालासोपाऱ्यातील एका कार्यक्रमात शेलार यांनी ही टीका केली. ही टीका केल्यानंतर या टीकेला गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला आहे.
नालासोपारा येथील एका कार्यक्रमात भाजप नेते आशीष शेलार यांनी सीएएवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेले नागरिकत्व संशोधन कायदा लागू न करायला हे राज्य का तुमच्या बापाचं आहे का?, अशा शब्दात शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. या टीकेवर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला असून आशीष शेलारांना हे वक्तव शोभत नाही. भाजपच्या हातातून सत्ता गेल्याने भाजप अस्वस्थ आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
जाहिरात: साई इस्टेट कन्सल्टंट अॅण्ड डेव्हलपर्स, संगमनेर
शेतजमीन, प्लॉट, बंगले, गाळा, गुंठेवारी इ. खरेदी विक्रीचे व्यवहार खात्रीशीर केले जातील. तसेच शेतीचे प्लॉट बिगर शेती (N.A.) केले जातील. गुंतवणुकीसाठी प्लॉट उपलब्ध. संपर्क: 9405404536
आशीष शेलार जर बाप काढत असतील तर आम्ही गुजरातमध्ये जाऊन बापाचा शोध घेत नाही, अशा शब्दांत आव्हाड यांनी आशीष शेलार यांना प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, मी कुणावरही वैयक्तीक टीका केली नाही, असे स्पष्टीकरण आशीष शेलार यांनी दिले आहे.
Website Title: News enforce the citizenship law