संगमनेर तालुक्यात लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार
संगमनेर(News): संगमनेर तालुक्यात शुक्रवारी १२ जून रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास अल्पवयीन १६ वर्षीय मुलीला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याबाबत घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आरोपीने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला घरी बोलावून घेतले. नंतर घराच्या गच्चीवर नेत तिच्यावर त्याने अत्याचार केला.
याबाबत त्या मुलीच्या घरी समजल्यावर तिच्या वडिलांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली. दीपक उर्फ प्रदीप भाऊसाहेब वाकळे (वय ३२, रा.कुबडी मळा, कोठे बुद्रूक, ता.संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहे.
Website Title: News Atrocities on a girl in Sangamner taluka