Home महाराष्ट्र धक्कादायक! नवविवाहितेवर सासरा व त्याच्या मित्राने केला बलात्कार

धक्कादायक! नवविवाहितेवर सासरा व त्याच्या मित्राने केला बलात्कार

Breaking News | Bhiwandi Crime: एका नवविवाहितेवर सासरे आणि त्याच्या मित्राने जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केला.

Newlywed was raped by father-in-law and his friend

भिवंडी:  भिवंडीत एक धक्कादायक घटना समोर आली  आहे. एका नवविवाहितेवर सासरे आणि त्याच्या मित्राने जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केला असून विवाहितेने तक्रार दिल्यावर नारपोली पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन सासरे व त्याच्या मित्राने विवाहितेवर बलात्कार केला. तब्बल १५ दिवस हा प्रकार सुरू होता. आरोपी व त्याचा मित्र घरात झोपले असल्याची संधी साधून घरातून पळून जाऊन विवाहितेने थेट पोलिस ठाणे गाठत. या प्रकरणी तक्रार दिली.

दोन्ही आरोपी सध्या फरार असून पोलिसांचे पथक त्यांचा शोध घेत असल्याची माहिती नारपोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भरत कामत यांनी दिली.

पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पीडित महिला आणि तिचा २६ वर्षीय पती सासरच्यालोकांपासून वेगळे राहत होते. ३० जानेवारी रोजी आरोपीने मुलीला तिच्या आई-वडिलांच्या घरी सोडण्याच्या बहाण्याने बाहेर नेले. मात्र, त्याऐवजी तो तिला स्वतःच्या घरी घेऊन गेला आणि तेथे त्याने तिला एका खोलीत डांबून ठेऊन त्याच्या मित्राला बोलावून घेतले. त्यानंतर दोन्ही आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. दरम्यान, सासरच्या ंनी आपल्या मुलाला सुनेला आई-वडिलांच्या घराजवळ सोडल्याची माहिती दिली.

आरोपी झोपेत असताना महिला पळून जाऊन तिच्या आई-वडिलांच्या घरी पोहोचल्यानंतर सत्य समोर आले. तेथून ती आई-वडिलांसमवेत या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात गेली, तेथे भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४, १२७ (४), ३५१(३), ७४ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Newlywed was raped by father-in-law and his friend

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here