Home महाराष्ट्र नवविवाहित सुनेनं किचनमध्ये स्वत:ला संपवलं, पाहताच सासूचाही जीव देण्याचा प्रयत्न

नवविवाहित सुनेनं किचनमध्ये स्वत:ला संपवलं, पाहताच सासूचाही जीव देण्याचा प्रयत्न

Satara: स्वयंपाकगृहात नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

Newlywed commits suicide by hanging herself in the kitchen

सातारा: कराड तालुक्यातील विंग येथे स्वयंपाकगृहात नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. यावेळी सुनेच्या आत्महत्येनंतर सासूने हाताच्या नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर संतप्त नवविवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या घरासमोरच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नीलम अनिकेत माने (वय २१) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. तीन महिन्यांपूर्वीच तिचा विवाह झाला होता. सासू राणी अंकुश माने यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की,  बीड येथील नीलमचा तीन महिन्यांपूर्वी विंग येथील अनिकेत मानेशी विवाह झाला होता. शनिवारी रात्री नीलम स्वयंपाकगृहात झोपली होती. तर पती अनिकेत, सासू राणी माने व सासरा अंकुश माने हे तिघे जण बाहेरच्या खोलीत झोपले होते. रविवारी सकाळी सातच्या सुमारास नीलम दरवाजा उघडत नसल्याने कुटुंबियांनी दरवाजा तोडून स्वयंपाकगृहात प्रवेश केला. त्यावेळी नीलमने पत्र्याच्या अँगलला ओढणीच्या मदतीने गळफास लावून घेतल्याचे दिसले. ही घटना पाहून सासू राणी माने यांनी दोन्ही हातांच्या नसा कापून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबियांनी त्यांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले.

घटनेची माहिती मिळताच कराड तालुका पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. तसेच घटना समजल्यानंतर मृत नीलमचे माहेरचे नातेवाईक कराडला दाखल झाले. त्यांनी कराड तालुका पोलीस ठाणे व उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात गर्दी केली होती.

नीलमच्या मृतदेहावर तिच्या सासरच्या दारात अंत्यसंस्कार करण्याची मागणी नातेवाइकांनी केली. त्यामुळे तणावाचे वातावरण झाले होते.

Web Title: Newlywed commits suicide by hanging herself in the kitchen

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here