onion Price rate: कांद्याच्या भावात घसरण, निम्म्याने घट
नेवासा | Newasa: कांद्याच्या भावात घसरण (onion Price rate falling) सुरूच आहे. नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल आणखी २०० रुपयांनी घसरणहोऊन १६०० रुपयांपर्यंत बाजारभाव आले आहेत, तीन आठवड्यात जवळपास निम्म्याने भाव कमी झाले आहेत.
शनिवारी कांद्याची 24 हजार 764 गोण्या आवक झाली. एक-दोन लॉटला 1500 ते 1600 रुपये भाव मिळाला. मोठा कलर पत्ती कांद्याला (Onion) 1200 ते 1400 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 1100 ते 1200 रुपे, गोल्टा कांद्याला 600 ते 800 रुपये, गोल्टी कांद्याला 300 ते 500 रुपये तर जोड कांद्याला 200 ते 500 रुपये भाव मिळाला.
Web Title: Newasa onion Price rate falling