Bhandardara Dam Update: भंडारदरा, घाटघर आणि रतनवाडीत पावसाने काहीसा जोर धरल्याने काल रविवारी सकाळपर्यंत भंडारदरात 46 तर निळवंडेत 70 दलघफू नवीन पाण्याची आवक.
भंडारदरा: उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात शनिवारपासून मान्सूनने हजेरी लावल्याने या धरणामध्ये नवीन पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे पाणलोटासह लाभक्षेत्रातील शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
भंडारदरा, घाटघर आणि रतनवाडीत पावसाने काहीसा जोर धरल्याने काल रविवारी सकाळपर्यंत भंडारदरात 46 तर निळवंडेत 70 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली होती.
11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरातील पाणीसाठा काल सकाळी 5314 दलघफू होता. शेतीसाठी आवर्तन सुरू असल्याने 70 दलघफू पाणी वापरले गेले. या धरणात नव्याने 46 दलघफू नवीन पाणी आले. काल सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 5290 (47.90टक्के) दलघफू पाणीसाठा होता. 8320 दलघफू क्षमतेच्या निळवंडेत काल सकाळी पाणीसाठा 1856 दलघफू होता. वाकी तलावातही यंदा समाधानकारक साठा आहे. सध्या या धरणात 42.16 दलघफू पाणीसाठा आहे. भंडारदरा परिसरात काल रविवारी दिवसभर पडलेल्या पावसाची नोंद 10 मिमी झाली आहे. पाणलोट धुक्याने लेपाटून गेला असून डोंगरदर्यांमधील ढबढबे आणि ओढेनाले सक्रिय होत आहेत.
काल सकाळपर्यंत संपलेल्या 24 तासांत नोंदवला गेलेला पाऊस असा- (मिमी) भंडारदरा 23, घाटघर 43, रतनवाडी 40, वाकी 19.
Web Title: New water inflow started in Bhandardara Dam Update
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App