Breaking News | Ahmednagar: अहमदनगरसह ४ जिल्ह्यांत होणार नवीन एमआयडीसी.
मुंबई : राज्यात नाशिक, अहमदनगर, अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्यात चार नव्या एमआयडीसी उभ्या करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. (Akole MIDC)
गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथे, अहमदनगर जिल्ह्यातील लिंगदेव, अकोले येथे, नाशिक जिल्ह्यातील जांबुटके- कळवण सुरगाणा, तसेच अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे ‘एमआयडीसी’ उभारण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव तातडीने सादर करावेत.
तसेच, राज्यात यापुढे नवीन ‘एमआयडीसी’ उभारण्यासाठी किमान शंभर एकर जमिनीची उपलब्धता करून देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिले. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील डुंबरवाडी येथे राज्यासह केंद्राच्या विविध योजनांच्या माध्यमातून फूड प्रोसेसिंग पार्क उभारण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीला उद्योग मंत्री उदय सामंत, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, तसेच काही आमदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Web Title: New MIDC at Akole Lingdev
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study