बनावट लग्न करून फसवणारी महिलांची टोळी गजाआड
Ahmednagar News Live | Nevasa Crime | नेवासा: लग्नाळू तरुणांना मुलगी दाखविण्याचा बहाणा करून त्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा डाव एका तरुणाने उधळून लावला आहे. नेवासा तालुक्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याबाबत जालना जिल्ह्यातील विवाहेच्छुक युवकाच्या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात तीन महिला व दोन पुरुषांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे. नेवासा न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती पोलीस हवालदार तुळशीराम गीते यांनी दिली.
याबाबत विजय देविदास पवार (वय २५) धंदा- मजुरी रा. लोधी मुहल्ला जालना याने फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, मी जालना शहरात आई, भाऊ, भावजयी आदींसह एकत्र कुटूंबात राहत असून शहरात आरओ फिल्टरचे मजुरीने काम करतो. विजय तरुणाचे लग्न जमत नव्हते त्यामुळे माझी बहिण मनिषा विष्णु ब्राम्हणे ही तीर्थपुरी ता. घनसांगवी जि. जालना येथे राहतात. माझी बहिण मनिषा हिने तिच्या गावातील परिचित असलेल्या ओमकार भानुदास कासार याला माझ्या लग्नासाठी मुलगी पाहण्यास सांगितले होते. ओमकार कासार याने एक मुलगी असून नेवासा येथे जावे लागेल. मुलीच्या नातेवाईकांना लग्नासाठी १ लाख २० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्याप्रमाणे ठरवून मी व माझी बहिण मनिषा तिची सासू वच्छला, ओमकार भानुदास कासार व त्याचा मित्र रावसाहेब नारायण वानखेडे असे आम्ही खासगी वाहनाने ३१ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता निघून नेवासा येथे बसस्थानाकजवळ आलो.
नेवाशात आल्यावर आम्ही ओमकार कासार यास म्हणालो की आम्हाला मुलगी व तिचे नातेवाईक दाखवा. त्यावर मी माझ्याकडे रोख पैसे नाहीत घरी गेल्यानंतर देतो, असे म्हणालो. परंतु ओमकार कासार हा आम्हाला मुलगी व तिचे नातेवाईक दाखवित नव्हता म्हणून मी नेवासा येथे मिनी बँकेमध्ये माझ्या खात्यावरील पैसे काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पैसे निघाले नाहीत. त्यानंतर ओमकार कासार याने एका महिलेला फोन करुन बसस्थानकासमोर बोलावून घेतले. त्यावेळी तेथे दोन महिला व एक मुलगी आली व त्याने आमच्याबरोबर ओळख करून दिली. त्यावेळी त्याने आम्हाला प्रथम मुलीचे नाव कोमल राजू साठे, तिची मावशी संगिता वसंत जाधव रा. पैठण जि. औरंगाबाद व दुसरी महिला सुमन रमेश वाघमारे रा. हडपसर (पुणे) असे असल्याचे सांगितले.
मुलगी दाखविताच ते पैशाची घाई करु लागले. मुलीने आई-वडील नाहीत. मावशी संगिता जाधव माझे लग्न करून देणार असल्याचे सांगितले. त्यांच्या वागण्याबाबत संशय आल्याने व माझी फसवणूक होईल, असे वाटू लागल्याने मी पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी सुमन वाघमारे ही आम्हाला म्हणाली की, आम्ही आमच्यासोबत अजुन चार मुली आणलेल्या आहेत. त्याचेवर तुम्ही अतिप्रसंग करत आहात म्हणून आरडाओरडा करु गुपचूप आमचे ठरलेले १ लाख २० हजार रुपये द्या. त्यावेळी आमची फसवणूक झालेली आहे, अशी आमची खात्री झाली म्हणून आम्ही नेवासा पोलीस ठाण्यास संपर्क केला व पोलीस आम्हास पोलीस स्टेशनला घेवून आले.
नेवासा पोलिसांनी ओमकार भानुदास कासार याचे सांगणेवरून त्याचेबरोबर त्याचा जोडीदार रावसाहेब नारायण वानखडे दोघे रा. तिर्थपुरी ता. घनसांगवी जि. जालना असे खासगी गाडीने आलो असता तेथे महिला कोमल राजू साठे , संगिता वसंत जाधव रा. पैठण, जि. औरगाबाद, सुमन रमेश वाघमारे रा. हडपसर, ता. हवेली, जि. पुणे यांच्यावर नेवासा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ४२०, १२० ब ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार तुळशीराम गिते हे करत आहेत.
Web Title: Nevasa Crime gang of women cheating by fake marriage has gone missing