धक्कादायक: १० वर्षीय मुलाच्या डोक्यात दगड घालून निर्घुण खून
नेवासा | Murder Case: नेवासा तालुक्यातील वरखेड येथे १० वर्षीय मुलाची दगडाने ठेचून निर्घुण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी मुलाचा मृतदेह रामडोह रस्त्याच्या पाटचारी परिसरात डोके छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला.
या घटनेची माहिती समजताच नेवासा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोहम उत्तम खिलारी वय १० रा. बुलढाणा हल्ली वरखेड ता. नेवासा असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. मयत सोहम हा ८ ते ९ वर्षापासून आपल्या दोन भाऊ व आई व सावत्र वडिलांसोबत वरखेड येथे राहत होता.
दरम्यान सोहमचा मृतदेह पहाटे रामडोह रस्त्यालगतच्या पाटचारी परिसरातील रस्त्याचे कडेला छिन्नविच्छिन्न अवस्थेत परिसरातील लोकांना आढळून आला. या ठिकाणी पोलीस फौजफाटा दाखल होत पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरणीय तपासणीसाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. पोलीस निरीक्षक विजय करे, पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल अधिक तपास करीत आहे.
Web Title: Nevasa 10 years child murder