Home अहमदनगर कोपरगावात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी !

कोपरगावात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी !

Breaking News | Ahilyanagar assembly Elections 2024: कोपरगावात एकूण १२ उमेदवार रिंगणात.

NCP vs NCP in Kopargaon assembly Elections 2024

कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदार संघात १९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. सोमवारी ७ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार आशुतोष काळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप वर्षे यांच्यासह एकूण १२ उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होणार आहे.

 भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे काळे यांची फारसी धावपळ होणार नाही अशी चर्चा आहे. मात्र, संदीप वर्षे यांच्या उमेदवारीने महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव ठाकरे गट), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यासह मित्र पक्षांमध्ये चांगलीच उर्जा निर्माण झाली आहे. त्यातच समाजवादी पार्टीकडून मेहबूब खान अहमद खान, बळीराजा पार्टीकडून शिवाजी कवडे व वंचित बहुजन आघाडीकडून शकील चोपदार हे देखील निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे प्रचारादरम्यान सभा, गाड्या, कार्यकर्ते यांनी पुढील १५ दिवस मतदार संघ दणाणून जाणार आहे. निवडणूक लढवणारे उमेदवार आशुतोष काळे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट), मेहबूब खान अहमद खान (समाजवादी पार्टी), संदीप वर्षे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट), शिवाजी कवडे (बळीराजा पार्टी), शकील चोपदार (वंचित बहुजन आघाडी) तर किरण चांदगुडे, खंडू थोरात, चंद्रहस औताडे, दिलीप औताडे, विजय जाधव, विश्वनाथ वाघ, संजय काळे हे अपक्ष निवडणूक लढवीत आहेत.

 यांनी घेतली निवडणुकीतून माघार

विजय भगत, शंकर लासुरे, बाळासाहेब जाधव, विजय वडांगळे, मनीषा कोल्हे, राजेंद्र कोल्हे, प्रभाकर अहिरे या सर्वांनी आपले अपक्ष उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहे.

Web Title: NCP vs NCP in Kopargaon assembly Elections 2024

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here