नायब तहसीलदार लाच स्वीकारल्याप्रकरणी एसीबीच्या जाळ्यात
Pandharpur News: मागणाऱ्या शेतकऱ्याकडून लाच (Bribe) स्वीकारल्याप्रकरणी पंढरपुरातील नायब तहसीलदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडल्याची कारवाई.
पंढरपूर : शेतीची जागा खरेदी करण्यासाठी परवानगी मागणाऱ्या शेतकऱ्याकडून लाच स्वीकारल्याप्रकरणी पंढरपुरातील नायब तहसीलदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडल्याची कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पंढरपूर तालुक्यातील एक शेतकरी शेतीला रस्त्यासाठी दहा गुंठे जागा खरेदी करण्यासाठी परवानगी मिळावे म्हणून प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार ए. एस. तोंडसे यांच्याकडे परवानगी मागत होता. मागील अंदाजे सहा महिन्यापासून शेतकरी यासाठी वारंवार विनंती करत होता. मात्र परवानगी देण्यासाठी तोंडसे संबंधित शेतकऱ्यास २० हजार रुपयांची लाच मागत होते. यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्याने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. तत्काळ दखल घेत पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक सापळा रचला.
या दरम्यान १५ हजाराची लाच स्वीकारताना तोंडसे रंगेहाथ सापडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, उपविभागीय अधिकारी गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलिस कर्मचारी अतुल घाडगे, सलीम मुल्ला, राहुल गायकवाड यांनी केली आहे.
Web Title: Nayab Tahsildar of Pandharpur in the net of ‘ACB’ while taking a bribe of 15 thousand
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App