Home अकोले निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ अकोले तालुका कार्यकारिणी जाहीर

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ अकोले तालुका कार्यकारिणी जाहीर

Nature and Social Environment Pollution Prevention Board Akole 

Akole | अकोले,दि.१०(प्रतिनिधी): निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या अकोले तालुका अध्यक्षपदी रामलाल हासे यांची तर कार्याध्यक्षपदी प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, सचिवपदी हेमंत कुसळकर यांची निवड करण्यात आली आहे.

राज्य कार्यकारिणी सदस्य रमेश खरबस यांच्या अध्यक्षतेखाली ही तालुका कार्यकारिणी जाहीर  करण्यात आली.यात उपाध्यक्षपदी राजेंद्र मालुंजकर व विजया पाडेकर,सहसचिव-प्रतिभा देशमुख,मुख्य संघटकपदी -प्रा.दीपक जाधव,खजिनदार-ज्ञानेश्वर जोर्वेकर,प्रकल्प प्रमुखपदी -अश्विनी काळे तर जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी प्रकाश महाले व भाऊसाहेब कासार यांची निवड करण्यात आली आहे.तर मुख्य सल्लागार सदस्य म्हणून पद्मश्री राहीबाई पोपेरे,वकील मंगला हांडे,सतीश नेहे आणि जितीन साठे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

यावेळी प्रास्ताविक करून रमेश खरबस यांनी  मंडळाचा उद्देश स्पष्ट केला.सूत्रसंचालन भाऊसाहेब कासार यांनी केले.तर प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांनी आभार मानले.

या निवडीबद्दल निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे संस्थापक राज्याध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे,राज्य कार्याध्यक्ष विलास महाडिक,राज्य सचिव प्रमोद मोरे तसेच जिल्हाध्यक्ष तुकाराम अडसूळ आदींनी अभिनंदन केले आहे.

Web Title: Nature and Social Environment Pollution Prevention Board Akole 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here