नाशिक पुणे महामार्गावर वऱ्हाडाच्या टेम्पो उलटला, भीषण अपघात
Pune: खेड तालुक्यातील जाऊळके खुर्द येथील आदिवासी ठाकर समाजाच्या लग्नाच्या वऱ्हाडाच्या टेम्पोला झालेल्या अपघातात सहा जणांना गंभीर दुखापत झाल्याची घटना.
राजगुरुनगर : खेड तालुक्यातील जाऊळके खुर्द येथील आदिवासी ठाकर समाजाच्या लग्नाच्या वऱ्हाडाच्या टेम्पोला झालेल्या अपघातात सहा जणांना गंभीर दुखापत झाली. या घटनेत दहा जण जखमी झाले. रविवारी (दि. 11 ) सायंकाळी सातच्या दरम्यान हा अपघात घडला. जवळके येथील ठाकरवाडीतील लग्नाचे हे वऱ्हाड होते. चाकण परिसरातून लग्ना उरकल्यानंतर परत येत असताना राजगुरुनगर जवळच्या राक्षेवाडीहद्दीत पुणे- नाशिक महामार्गावर अपघात झाला.
टेम्पोच्या मागच्या चाकाचा टायर फुटल्यामुळे टेम्पो रस्त्यावर उलटला. टेम्पोमधील महिला, लहान मुले, युवक, असे 35 जण रस्त्यावर फेकले गेले. टेम्पोच्या टपावर बसलेले सहा युवक हे थेट रस्त्यावर डोक्यावर पडल्याने त्यांना गंभीर मार लागला. राजगुरुनगरमधील चांडोली ग्रामीण रुग्णालयात, तसेच खासगी रुग्णालयात जखमींना उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
महाळुंगे येथे लग्नकार्यासाठी गेलेले जऊळके बु येथील वऱ्हाड घरी परतत असताना राजगुरूनगर बायपास येथे टेम्पोचा टायर फुटला. त्यामुळे टेम्पो उलटला. टेम्पोमध्ये तीस ते पस्तीस वऱ्हाडी बसले होते. यामध्ये समीक्षा साहेबराव गावडे, संतोष गावडे, रोहित पारधी, साक्षी गावडे, रोहिणी पारधी,कमल गावडे, शिवाजी गावडे, ओम गावडे, साई गावडे, आकांशा गावडे व इतर तीन जण या अपघातात गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी राजगुरूनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Web Title: Nashik Pune highway, the tempo of the groom reversed, a terrible accident
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App