Nashik Oxygen leak: नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती, २२ रुग्णांचा मृत्यू, आकडा वाढण्याची शक्यता
Nashik Oxygen leak: एका बाजूला ऑक्सिजनचा तुटवडा भासत असताना नाशिकमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीला दुपारी बारा वाजेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गळती झाल्याने टाकीतून ऑक्सिजन वाया जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. ही गळती बंद करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहे.
ऑक्सिजन गळतीमुळे तब्बल २२ रुग्णांचे ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे.
नाशिक महापालिका आयुक्त तब्बल २ तासांनी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल हलगर्जीपणा केलेल्यांची गय केली जाणार नाही.१० ते ११ रुग्ण मृत्यू पडल्याची शक्यता असल्याचे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले होते. या घटनेमुळे ३० ते ३५ रुग्ण दगवाल्याची भीती व्यक्त केली.
या हॉस्पिटलमध्ये १५० रुग्ण आहेत. ऑक्सिजन गळतीमुळे रुग्णालयातील ऑक्सिजन हळूहळू संपत आहे. त्यामुळे आणखी रुग्ण दगावण्याची भीती व्यक्त होत आये. या घटनेत १० ते११ रुग्ण मृत्यू झाल्याची पप्राथमिक माहिती समोर आली आहे. ऑक्सिजन नसल्याने रुग्णांची प्रकृती खालावत आहे. अनेक रुग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत. ओक्सिजन टाकीला गळती लागल्यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. त्यांना अन्य ऑक्सिजन असलेल्या रुग्णालयात हलविण्यात येत आहे.
Web Title: Nashik Oxygen leak