भाजपामुळेच तांबेंचा विजय : विखे-पाटील
Nashik Graduate Election: सत्यजित तांबे यांनी भाजपात यावे असे वाटते. शेवटी निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे,’ असे मत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
कऱ्हाड | सातारा: भाजपच्या मदतीनेच सत्यजित तांबे यांना नाशिक पदवीधर मतदारसंघातून विजय मिळविता आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तांबेंनी मानलेल्या आभारातच सगळे दडले आहे. त्यामुळे त्यांनी भाजपात यावे असे वाटते. शेवटी निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे,’ असे मत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केले.
विखे-पाटील शुक्रवारी कन्हाड येथे कृष्णा विश्व विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. ते काँग्रेस सोडतील का? तुम्हाला काय वाटते? याबाबत छेडले असता विखे-पाटील म्हणाले, ‘खरे तर हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा; पण मी जेव्हा भाजपमध्ये गेलो तेव्हा हेच बाळासाहेब थोरात मी एकटा इथली खिंड लढवून दाखवतो, अशी भीमगर्जना करीत होते.
Web Title: Nashik Graduate Election Tambe’s victory is due to BJP
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App