बस आयशर टेम्पो भीषण अपघात, बसला आग लागल्याने १० ते १२ जणांचा होरपळून मृत्यू
Nashik Bus Accident: बस आयशर टेम्पो भीषण अपघात, बसला आग (burn) लागल्याने १० ते १२ जणांचा होरपळून मृत्यू, मुख्यमंत्री यांनी जाहीर केली मदत.
नाशिक: यवतमाळच्या पुसदहून मुंबईला येण्यासाठी चिंतामणी ट्रॅव्हल्सची बस निघाली होती. या बसचा पहाटे पावणे पाच पाचच्या एक आयशर टेम्पो आणि लक्झरी बस यांच्या अपघात झाला. या अपघातानंतर खासगी बसमध्ये आग (Burn) लागली. या आगीत अनेक प्रवाशी होरपळले तर बसही जळून खाक झाली. आगीत जिवंत जळालेल्या प्रवाशांची ओळख पटवण्याचं आव्हान सध्या आहे
बसमधील सामान, प्रवाशांची माहिती, ओळखपत्र यांच्यामदतीने मृताची ओळख पटवण्याच काम सुरु आहे. या लक्झरी बसमध्ये एकूण 50 प्रवासी होते, असं प्रत्यक्षदर्शीनी म्हटलेस नाशिकच्या मिरची हॉटेलजवळ हा भीषण अपघात घडला ज्या ठिकाणी अपघात झाला, ते ठिकाणी एक्सिडंटस्पॉट म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी स्पीड ब्रेकर आणि अपघात रोखण्यासाठी अन्य उपाययोजना करण्याची आता व्यक्त होते आहे.
नाशिकमध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदतीची घोषणा केलीय. अपघातामध्ये मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलीय तर जखमींना तातडीने चांगल्यातले चांगले उपचार दिले जावेत, असे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
या भीषण अपघातानंतर (Accident) फायर ब्रिगेट यायला उशीर झाला, असा आरोप काही प्रत्यक्षदर्शीनी केलाय त्याबाबतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय यंत्रणांना विचारणा केली. पाच मिनिटांत फायर ब्रिगेडची गाडी अपघातस्थळी दाखल झाली, अशी माहिती यंत्रणांकडून मिळाली. असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
नाशिकमध्ये झालेल्या भीषण अपघाताची चौकशीही केली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) म्हटलंय अपघातात चूक कोणाची होती, याची चौकशी होईल तसंच मदत पोहोचायला उशीर झाला का याचाही तपास केला जाईल चौकशीअंती दोषींवर कारवाईही करू, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना नमूद केलं.
Web Title: Nashik Bus Accident Bus burn 10 death