Home अहमदनगर नाना पटोलेंचा थोरातांना मोठा धक्का, अहमदनगर जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त

नाना पटोलेंचा थोरातांना मोठा धक्का, अहमदनगर जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त

Ahmednagar News: अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश उर्फ बाळासाहेब साळुंखे यांना निलंबित केल्यानंतर आता संपूर्ण कार्यकारिणीच बरखास्त करण्यात आली. (Nashik Graduate Constituency Election, Satyajeet Tambe)

Nana Patole is a big blow to the youth, Ahmednagar

अहमदनगर:सत्यजीत तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे काँग्रेसमध्ये सुरू झालेले भूकंपाचे धक्के अद्याप सुरूच आहेत. तांबे यांना पाठिंबा दर्शविल्याने अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश उर्फ बाळासाहेब साळुंखे यांना निलंबित केल्यानंतर आता संपूर्ण कार्यकारिणीच बरखास्त करण्यात आली आहे. त्यामुळे अंतर्गत गटबाजीचा विचार केल्यास एकप्रकारे बाळासाहेब थोरात यांनाच हा धक्का मानला जात आहे.

अहमदनगर जिल्ह्यात कॉंग्रेस पक्षात ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व आहे. स्थानिक अध्यक्षासह अनेक पदाधिकारी त्यांचेच समर्थक आहेत. त्यामुळे ही कार्यकारिणी बरखास्त करून पटोले यांनी थेट थोरात यांनाच धक्का दिल्याचे मानले जात आहे. असे असले तरी आता या थोरात समर्थकांना उलट मोकळे रान प्राप्त झाले असाही त्याचा अर्थ काढला जात आहे.

कॉंग्रेसने तिकीट देवूनही सुधीर तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर डॉ. सुधीर तांबे यांनी पक्षाकडून निवडणुकीसाठी अर्ज भरला नाही. त्यानंतर सुधीर तांबेंसह सत्यजीत तांबे यांच्यावर काॅंग्रेसने निलंबनाची कारवाई केली. मात्र, त्यानंतर सत्यजीत तांबेंवर अन्याय झाला असे सांगत बाळासाहेब सोळुंखे यांनी राजीनामा दिला. तत्पूर्वी त्यांनी सत्यजीत तांबेंचा प्रचार करण्याबाबत भाष्य केले होते. त्यामुळे त्यांना काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खुलासा करा अशी नोटीस पाठवली होती. पण सोळुंके यांनी नोटीसीला उत्तर देण्यापेक्षा राजीनामा देत सत्यजीत तांबेंना एकप्रकारे भक्कम पाठींबा दिल्याचेच स्पष्ट केले.

कॉंग्रेसच्याच  अनेक पदाधिकाऱ्यांनी तांबे यांना पाठिंबा दिल्याने प्रदेश काँग्रेसकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. प्रदेश काँग्रेसकडून आणखी एक कारवाईचे पत्र आले. या पत्रानुसार आता अहमदनगर जिल्ह्याची पक्षाची संपूर्ण कार्यकारिणीच बरखास्त करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्याचा आदेश काढला आहे.

जिल्हा कार्यकारिणीत थोरात समर्थकांची संख्या अधिक आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख हे प्रदेशाध्यक्ष पटोले यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांच्या सांगण्यावरून जिल्ह्यातील निर्णय घेतले जात असल्याचे पक्षात बोलले जाते.

Web Title: Nana Patole is a big blow to the youth, Ahmednagar

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here