Home क्राईम Rape | धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

Rape | धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

Nagpur Gang Rape: मुलीला धमकावून सहा मित्रांसह मुलीवर अत्याचार

Nagpur Crime a Minor Girl gang rape

नागपूर: जिल्ह्यातील उमरेडमध्ये ११ वर्षीय मुलीवर सामुहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ९ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.

अल्पवयीन मुलीवर गेल्या एक महिन्यापासून अत्याचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  रोशन कारगाकर आणि गजानन मुरस्कर या दोन मित्रांनी सुरुवातीला स्वतःच्या घरी नेऊन त्या मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर रोशन वेळोवेळी मुलीला घरी बोलवून अत्याचार करायचा. त्यानंतर प्रेमदास गाठीबांधे नावाच्या मित्राला माहीत झाल्यानंतर त्याने मुलीला धमकावून सहा मित्रांसह मुलीवर अत्याचार केला. एका खुनाच्या तपासादरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यावर पोलिसांनी  गुन्हा दाखल करत नऊ आरोपींना अटक केली. हा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

Web Title: Nagpur Crime a Minor Girl gang rape

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here