Home अहमदनगर नगर अर्बन बँक कर्ज फसवणूक प्रकरणात डॉ. शेळके अटकेत

नगर अर्बन बँक कर्ज फसवणूक प्रकरणात डॉ. शेळके अटकेत

Breaking News | Ahmednagar: नगर अर्बन बँकेच्या 291 कोटींच्या कर्ज फसवणूक प्रकरणात डॉ. नीलेश शेळके याला अटक (Arrested). (Nagar Urban Bank loan fraud case)

Nagar Urban Bank loan fraud case Shelke arrested

अहमदनगर: नगर अर्बन बँकेच्या 291 कोटींच्या कर्ज फसवणूक  प्रकरणात डॉ. नीलेश शेळके याला अटक करण्यात आली आहे. कर्ज प्रकरणातील गैरव्यवहार, तसेच बँकेच्या शाखांतर्गत व्यवहारासाठी वापरल्या जाणार्‍या एचओबीआयटी खात्यातून डॉ. शेळके याच्या खात्यात रकमा वर्ग झाल्याचे फॉरेन्सिक ऑडिटमध्ये समोर आले आहे. त्यामुळे त्याला पुन्हा अटक करण्यात आली आहे. दरम्यान, डॉ. शेळके याला यापूर्वी कर्ज फसवणूक प्रकरणात इतरही गुन्ह्यात अटक  झालेली होती.

आर्थिक गुन्हे शाखेकडून नगर अर्बन बँकेच्या कर्ज फसवणूक घोटाळ्याचा तपास सुरू आहे. माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीनुसार दाखल गुन्ह्यात बँकेच्या सर्व कर्ज खात्यांचे व व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात आलेले आहे. त्या आधारावर काही संचालक, कर्जदार व बँकेतील अधिकारी व कर्मचार्‍यांना यापूर्वी अटक  झालेली आहे. शहर सहकारी बँक व नगर अर्बन बँकेतील कोट्यवधी रूपयांच्या कर्ज गैरव्यवहार प्रकरणी यापूर्वी डॉ. शेळके अटकेत होता.

आर्थिक गुन्हे शाखेमार्फतच याचा तपास सुरू होता. त्यात शेळके याला जामीन मंजूर झालेला आहे. सोमवारी डॉ. शेळके न्यायालयात हजर होता. तेथून बाहेर पडल्यावर आर्थिक गुन्हे शाखेने त्याला दुसर्‍या गुन्ह्यात अटक केली. त्याला मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी सांगितले.

Web Title: Nagar Urban Bank loan fraud case Shelke arrested

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here