Nagar Panchayat Election Result : मुख्यमंत्री असलेला पक्ष चौथ्या क्रमांकावर
Nagar Panchayat Election Result: महाराष्ट्रातील नगरपंचायतीचे निकाल आज जाहीर झाले आहे. या निकालात महाविकास आघाडीची सरशी दिसून येत असली तरी भाजप हा क्रमांक एक नंबरचा पक्ष असल्याचा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच देवेंद्र फडवणीस यांनी शिवसेनेला टोला लगाविला आहे. मुख्यमंत्री ज्या पक्षाचा आहे तो पक्ष चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, 106 पैकी 97 नगर पंचायतीचे निकाल लागले आहेत. त्यातील सर्वाधिक 27 नगर पंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्या आहेत. तर त्यापाठोपाठ भाजपच्या ताब्यात 22 नगर पंचायती आल्या आहेत. तर 21 नगर पंचायतीसह काँग्रेस तिसऱ्या आणि 17 नगर पंचायतींसह शिवसेना चौथ्या क्रमांकावर आहे.
नगर पंचायत निकालाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत भाजपच क्रमांक एकचा पक्ष राहिला आहे. आताही आम्ही पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहोत. 2017 मध्ये जेव्हा आमचं सरकार होतं, तेव्हा झालेल्या नगर पंचायत निवडणुकीत आम्हाला जेवढ्या जागा मिळाल्या होत्या, त्यापेक्षाही जवळपास 65 जागा भाजपला जास्ती मिळाल्या आहेत. काँग्रेस, एनसीपी आणि शिवसेना यांनी साम, दाम, दंड, भेद असा सगळ्याचा वापर केला. सत्तेचा प्रचंड वापर करुनही त्यांना यश मिळालं नाही. जनतेचा आशीर्वाद आणि जनतेचा विश्वास भाजप आणि पंतप्रधान मोदींवर कायम असल्याचे त्यांनी म्हंटल आहे.
Web Title: Nagar Panchayat Election Result