अकोले तालुक्यात माय लेकरांचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू, आत्महत्या की घातपात
अकोले | Akole: अकोले तालुक्यातील मान्हेरे येथील पांडू शंकर गभाले यांच्या शेतातील विहिरीत माय लेकरांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
गंगुबाई यशवंत गभाले वय ३१ आणि मुलगा ज्ञानेश्वर यशवंत गभाले वय ५ या दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. अकोले तालुक्यातील मान्हेरे गावाच्या शिवारात पांडू शंकर गभाले यांच्या शेतातील विहिरीत पाण्यात गंगुबाई यशवंत गभाले व ज्ञानेश्वर या माय लेकरांचा पडून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची खबर राजूर येथील देशमुखवाडीचे मारुती गोगा देशमुख यांनी राजूर पोलिसांना दिली.
सदर घटनेची माहिती मिळताच राजूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. विहिरीत खूप पाणी असल्यामुळे मृतदेह पाण्यातून बाहेर काढणे अवघड झाले. यामुळे दोन विद्युत पंपाच्या सहायाने पाणी उपसून दुपारी मायलेकांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक तपासणी करण्यात आली नंतर मृतदेह प्रवरा रूग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. ही घटना आत्महत्या आहे की घातपात (suicide or Murder) हे शवविचेदन अहवालात आल्यावर समजणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Web Title: My laker drowned in a well suicide or Murder in Akole taluka