Home महाराष्ट्र भररस्त्यात प्रेयसीची हत्या, स्वत:ही त्याच चाकूने संपविले आयुष्य

भररस्त्यात प्रेयसीची हत्या, स्वत:ही त्याच चाकूने संपविले आयुष्य

Breaking News | Mumbai Crime: दहा वर्षांचे प्रेमसंबंध तुटल्याने प्रियकराचे संतापाने कृत्य.

Murdered his lover on the street, ended his own life with the same knife

मुंबई : दहा वर्षांचे प्रेमसंबंध तुटल्यानंतर प्रियकराने संतापाने प्रेयसीवर दिवसाढवळ्या भररस्त्यात चाकूने वार केले. यावेळी बचावासाठी तिने नर्सिंग होममध्ये धाव घेतली. परंतु, त्यानंतरही न थांबता त्याने तिथे जाऊन तिच्यावर वार केले. परिसरातील नागरिकांनी लाठी, पेव्हर ब्लॉक हल्लेखोर प्रियकराच्या दिशेने फेकून तिची सुटका करत बाहेर काढले. तोपर्यंत त्यानेही स्वतःञ्तर वार करत आयुष्य संपविले. काळाचौकी येथील दिग्विजय मिलजवळ ही थरारक घटना शुक्रवारी घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीची उपचारादरम्यान मृत्यूशी झुंज संपली.

सोनू बराय (२४) व मनीषा यादव (२४), अशी मृतांची नावे आहेत. दोघेही आंबेवाडी परिसरात राहायचे. सोनू केटरिंगचे काम करत होता. गेल्या ८ ते १० वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध होते. मात्र, सोनू तिच्यावर संशय घ्यायचा. त्यामुळे दोघांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली. याच रागातून मनीषाने नाते तोडण्याचा निर्णय घेतला.

८ ते १० दिवसांपूर्वी त्यांचे नाते संपुष्टात आले होते. यामुळे सोनू संतप्त होता. त्याने शुक्रवारी मनीषाला भेटण्यासाठी बोलावले. चाकू सोबत घेऊनच तो या भेटीसाठी आला. सकाळी अकराच्या सुमारास दोघे एकत्र भेटले. परिसरात दोन राउंड मारल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. त्याचवेळी पुढे निघालेल्या मनीषावर त्याने अचानक चाकूने वार करण्यास सुरुवात केल्याने परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी मृत सोनूविरोधात हत्येचा व त्याने केलेल्या आत्महत्येबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तिची मृत्यूशी झुंजही संपली

वाहतूक पोलिस आणि तरुणांनी मनीषाला टॅक्सीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग रुग्णालय, तर सोनूला केईएम रुग्णालयात दाखल केले. दाखल कारण्यापूर्वीच पोलिसांनी सोनूला मृत घोषित केले. मनीषाला पुढील उपचारांसाठी जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सायंकाळी उपचारादरम्यान मनीषाचा मृत्यू झाला.

Breaking News: Murdered his lover on the street, ended his own life with the same knife

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here