पत्नीकडे वारंवार अनैतिक संबंधासाठी तगादा, मांत्रिक पतीने लिंबू उतारून टाकण्यासाठी बोलवून घेतले अन्…
Kolhapur Crime : मेंढपाळाची गळा चिरून हत्या (Murder), अनैतिक संबंधाच्या वादातून हा खून झाल्याचे समोर.
कोल्हापूर: जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील मजरेवाडीत सावकार कलाप्पा देबाजी (वय 35) या मेंढपाळाची गळा चिरून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली होती. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती.
मजरेवाडी-कुरुंदवाड रस्त्यावर बीपीड कॉलेज इमारतीजवळ एका शेतातील झुडपात मृतदेह आढळून आला होता. खुनाचे कारण स्पष्ट झाले नव्हते. मात्र, पोलिसांनी या खुनाचा 24 तासांमध्ये उलगडा केला आहे. अनैतिक संबंधाच्या वादातून हा खून झाल्याचे समोर आले आहे. संशयित आरोपी पोलिसांनी माळाप्पा कयप्पा हेगण्णावार (वय 25, रा. हेगण्णावार कोडी, नागराळे, ता. चिकोडी, जि. बेळगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत बाळाजी त्याच्या पत्नीकडे वारंवार अनैतिक संबंध ठेवण्यासाठी आग्रह करीत होता. यावरून दोघांमध्ये वादही झाला होता.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पोलिसांनी माळाप्पाला खुनानंतर अवघ्या 24 तासांमध्ये नागराळेमधील नातेवाईकांच्या घरातून अटक केली. संशयित आरोपी माळाप्पा हा मांत्रिक आहे. मयत सावकार देबाजी हा माळाप्पाच्या पत्नीकडे अनैतिक संबंधांसाठी वारंवार तगादा लावला होता. त्यामुळे चिडलेल्या माळाप्पाने लिंबू उतरून टाकण्याचा बहाणा करून बोलवून घेतल्यानंतर हात पाय बांधून कुऱ्हाडीने वार करून माळाप्पाचा खून केल्याची माहिती त्याने दिली आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचीही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
Web Title: murder was due to a dispute over an immoral relationship
See Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App