Home महाराष्ट्र Murder: तरुणाची हत्या करून मृतदेह तलावात फेकून दिल्याने खळबळ

Murder: तरुणाची हत्या करून मृतदेह तलावात फेकून दिल्याने खळबळ

Ambernath Murder News: मृतदेह पोत्यात भरून दगड बांधून तलावात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस. 

Murder the youth and throwing the Dead body in the lake

अंबरनाथ: अंबरनाथमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २० वर्षीय तरुणाची हत्या करून मृतदेह पोत्यात भरून दगड बांधून तलावात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून अधिक तपास करीत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  अंबरनाथच्या जावसई गावाजवळ डिफेन्स कॉलनीच्या मागच्या बाजूला तलाव आहे. या तलावात एक मृतदेह टाकण्यात आल्याचं स्थानिकांना गुरुवारी संध्याकाळी आढळून आले. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन दलाच्या साहाय्यानं हा मृतदेह बाहेर काढला. यावेळी एका २० ते २५ वर्षांच्या तरुणाचा हा मृतदेह असल्याचं समोर आले.

संपूर्ण विवस्त्र अवस्थेत असलेला हा मृतदेह एका प्लॅस्टिकच्या पोत्यात गुंडाळण्यात आला होता. तसंच हा मृतदेह पाण्यात फेकल्यानंतर तो वर येऊ नये, यासाठी प्लॅस्टिकच्या तीन गोण्यांमध्ये मोठमोठे दगडं भरून या गोण्या मृतदेहाला बांधण्यात आल्या होत्या. मात्र मृतदेह पाण्यात फुगल्यानं त्याचं डोकं पाण्याबाहेर आलं आणि ही बाब स्थानिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी हा मृतदेह (Dead body) बाहेर काढून मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला. या मृतदेहाबाबत जवळपासच्या भागात चौकशी केली असता हा मृतदेह उल्हासनगरच्या हनुमान नगर टेकडी परिसरात राहणाऱ्या विशाल राजभर या तरुणाचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी हत्येचा (Murder) गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केल्याची माहिती अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी दिली.

Web Title: Murder the youth and throwing the Dead body in the lake

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here