धक्कादायक! सहा जणांनी पाठलाग करीत सपासप वार करीत एकाची हत्या
Nashik Crime: पाठलाग करीत आलेल्या सहा जणांच्या टोळक्याने कटरच्या साहाय्याने सपासप वार करीत एका इसमाचा भोसकून खून (Murder).
मालेगाव | नाशिक: येथील वर्दळीच्या परिसरात भरदिवसा मोटारसायकलींवर पाठलाग करीत आलेल्या सहा जणांच्या टोळक्याने कटरच्या साहाय्याने सपासप वार करीत एका इसमाचा भोसकून खून केला. मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. अवघ्या दोन ते तीन मिनिटांत हत्या करून, सुसाट वेगाने पसार झालेल्या टोळक्याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
सोयगावच्या डी. के. कॉर्नरच्या पुढे इंदिरानगर परिसरात दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दोन मोटारसायकलींवर सहा जणांचे टोळके आले. मालेगाव कॅम्पातील गवळीवाड्यात राहणाऱ्या सुनील बाजीराव गुंजाळ (४०) या दुचाकीवर जाणाऱ्या इसमाचा ते पाठलाग करीत येत होते. टोळक्याने दुचाकी पाडल्याने गुंजाळ जीव वाचविण्यासाठी पळत सुटले. त्याचा पाठलाग करीत टोळक्याने गुंजाळ यांना पकडून त्यांच्यावर कटरने सपासप वार केले. मारेकरी सुसाट वेगाने फरार झाले.
Web Title: Murder Six people chased and stabbed one person
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App