Home पुणे शिंदे गटाच्या माजी उपसरपंचाची हत्या, काय घडलं?

शिंदे गटाच्या माजी उपसरपंचाची हत्या, काय घडलं?

Murder Case: ग्रामपंचयातचे माजी उपसरपंच आणि  शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार दत्तात्रय बंडू गिलबिले यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

murder of the former vice sarpanch of the Shinde group, what happened

शिरूर:  शुक्रापूर ग्रामपंचयातचे माजी उपसरपंच आणि  शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार दत्तात्रय बंडू गिलबिले यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक  माहिती समोर आली आहे. जुन्या वादातून एका युवकाने भरदिवसा त्यांच्या गळ्यावर धारधार शस्त्राने हल्ला करत त्यांची हत्या केली. गिलबिले यांच्यावर हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाला आहे.

मिळालेली अधिक माहिती अशी की,  शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार दत्तात्रय बंडू गिलबिले यांचे व त्यांच्या घराजवळ राहणारे पप्पू गिलबिले यांच्या पत्नी यांच्यात मोबाईलवर झालेल्या चॅटींगच्या कारणातून वाद झाला होता. त्यातून दोघांची भांडणेही झाली होती. आज  (1 डिसेंबर)  दतात्रय गिलबिले हे दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराच्या खाली बसले होते. त्याचवेळी अचानकपणे पप्पू गिलबिले तिथे आला. काही कळायच्या आतच त्यांने धारधार शस्त्राने दत्तात्रय गिलबिले यांच्या गळ्यावर वार केले. या हल्ल्यामुळे दत्तात्रय गिलबिले तिथेच कोसळले. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबियांनी आणि आसपासच्या नागरिकांनी त्यांना   उपचारासाठी शिक्रापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.

त्यानंतर पोलिसांनाही घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक विजय मस्कर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विकास कुंभार, पोलीस हवालदार संदीप कारंडे, अमोल नलगे, गणेश करपे, राजेश माने, सचिन होळकर, अमोल दांडगे, प्रतिक जगताप, उमेश जायपत्रे, नारायण वाळके यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. तर गिलबिले यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी वाघोली येथे हलवण्यात आले.

मात्र उपचारापूर्वी दत्तात्रय बंडू गिलबिले (वय 52 रा. कोयाळी पुनर्वसन शिक्रापूर) यांचा मृत्यू झाला, याबाबत रोहिणी दत्तात्रय गिलबिले (वय 42, रा. कोयाळी पुनर्वसन शिक्रापूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी पप्पू नामदेव गिलबिले रा. कोयाळी पुनर्वसन शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र पप्पू गिलबिले हा  हल्ल्यानंतर फरार झाला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय मस्कर हे करत आहेत.

Web Title: murder of the former vice sarpanch of the Shinde group, what happened

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here