Home पुणे बहिणीच्या प्रियकराची सर्वांदेखत हत्या, भाऊ आणि आईनेच डोक्यात फरशी घालून…..

बहिणीच्या प्रियकराची सर्वांदेखत हत्या, भाऊ आणि आईनेच डोक्यात फरशी घालून…..

Pune Crime News: बहिणीच्या प्रेमप्रकरणाची कुणकुण लागताच भावाने आईला हाताशी घेत तिच्या प्रियकराची हत्या केल्याचे समोर.

Murder of sister's boyfriend in public

पुणे:  पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. बहिणीच्या प्रेमप्रकरणाची कुणकुण लागताच भावाने आईला हाताशी घेत तिच्या प्रियकराची हत्या केल्याचे समोर आले आहे. पुण्यातील चंद नगर परिसरातील गुरुवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या भावाने आई आणि मित्रासह तिच्या प्रियकराला फरशीच्या तुकड्याने मारहाण केली होती. त्यात तो गंभीर जखमी झाला होता आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

या घटनेने पुणे पुन्हा एकदा हादरले आहे. प्रदीप अडागळे असं मृत तरुणाचे नाव आहे तर ऋषी काकडे असं आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,, बहिणीच्या बॉयफ्रेंडची आणि तिच्या भावात खून्नस होती. वर्षभरापासून आरोपीच्या डोक्यात हा राग होता. याच रागातून त्याने तरुणाच्या डोक्यात फरशी घालून त्याचा खून केला. पुण्यातील चंदन नगर परिसरातील गुरुवारी रात्री साडे ११ दरम्यानची घटना घडली आहे. प्रदीप अडागळे हा ऋषी काकडे यांच्या बहिणीचा बॉयफ्रेंड होता. वर्षभरापासून दोघांमध्ये खुन्नस होती. बहिणीला त्रास का देतो म्हणत कायम दोघामध्ये वादावादी व्हायची. काल रात्री साडे अकराच्या सुमारास दोघे चंदननगर परिसरात असलेल्या भाजी मंडीमध्ये ऋषी काकडे त्यांची आई सविता आणि मित्र शुभम मांढरे याने प्रदीपला थेट फरशीने मारहाण केली. यात प्रदीप गंभीर जखमी झाला होता. रात्रीच प्रदीपला ससूनला उपचारासाठी नेण्यात आल होत. मात्र आज सकाळी साडे सहा दरम्यान प्रदीपचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.

Web Title: Murder of sister’s boyfriend in public

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here