Home नाशिक सिन्नरमध्ये सराईत गुन्हेगाराची हत्या

सिन्नरमध्ये सराईत गुन्हेगाराची हत्या

Breaking News  Sinner Crime: भाऊबंदकीच्या वादात झालेल्या मारहाणीनंतर सराईत गुन्हेगाराचा खून झाल्याची घटना.

Murder of Sarai criminal in Sinnar

सिन्नर:  भाऊबंदकीच्या वादात झालेल्या मारहाणीनंतर सराईत गुन्हेगाराचा खून झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१४) रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान तालुक्यातील दातली येथे घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,’सागर मारुती भाबड (वय ४०) रा. नाशिकरोड असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी त्याचे वडील मारुती भाबड यांनी मेंढी येथील व्यसनमुक्ती केंद्रात आत्महत्या केली होती. त्यांच्या अंत्यविधीसाठी तो दातलीत आला होता. मात्र काल (शुक्रवारी) सायंकाळी त्याचे चुलत भावांबरोबर जुन्या कुरापती वरून भांडण सुरू झाले. जवळपास अर्धा तास हे भांडण सुरू होते. यानंतर हे भांडण इतके विकोपाला गेले की त्याच्याबरोबर चुलत भावांची तुंबळ हाणामारी सुरू झाली. या भांडणात चुलत भावांनी त्याच्या अंगावर स्कॉर्पिओ गाडी घातल्याचे समजते. या घटनेत १२ ते १३ जणांचा सहभाग असल्याचे कळते.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यानंतर रात्री उशिरा पोलिसांकडून १२ ते १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते. तर सागरचा मृतदेह सिन्नर ग्रामीण रुग्णालयात आणलेला असतानाही पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. सागर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर सिन्नर पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Murder of Sarai criminal in Sinnar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here