खळबळजनक घटना: अहमदनगर जिल्ह्यात एकाचा निर्घुण खून
अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथे आज पहाटे एकाचा निर्घुण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अतिशय क्रूरपणे हा खून करण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. मुकूंद वाकडे रा. आढळगाव, ता. नगर असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आढळगाव येथे शेतात मुकुंद वाकडे यांचा मृतदेह आढळून आला. सुरुवातीला वीजेचा धक्का बसून हा मृत्यू झाला असावा, असा संशय आला होता मात्र त्यांच्या शरीरावर गंभीर स्वरुपाच्या जखमा, खुणा आढळून आल्यामुळे हा खून झाला असल्याची खात्री झाली आहे. श्रीगोंदा पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. हा खून नेमका कशासाठी कोणी व का केला, याचा उलगडा होऊ शकलेला नाही.
Website Title: Murder of one in Ahmednagar district