अहमदनगर ब्रेकिंग: धारदार हत्याराने भोसकून तरुणाचा खून
Ahmednagar news: रोडलगतच्या शेतात तरुणाचा मृतदेह आढळून आला, अज्ञात व्यक्तीने धारदार हत्याराने भोसकून तरुणाचा खून (Murder) केल्याची घटना.
श्रीरामपूर | Shrirampur: पुणतांबा – श्रीरामपूर : रस्त्यावर तोडमल अज्ञात व्यक्तीने धारदार हत्याराने भोसकून तरुणाचा खून केल्याची घटना घडली. श्रीरामपूर रोडलगतच्या शेतात तरुणाचा मृतदेह आढळून आला असून राहाता पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणतांबा गावापासून दोन किलोमीटर अंतरावर श्रीरामपूर रोडलगत सुधीर अशोक कंधे या 35 वर्षीय तरुणाचा खून करुन मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकून देऊन आरोपी पसार झाला आहे. या तरुणाची हत्या का केली, याचे कारण अद्याप समोर आले नाही.
नवनाथ दादासाहेब चौधरी (रा. गोंधवनी, भैरवनाथनगर) यांनी राहाता पोलिस स्टेशनमध्ये याबाबत फिर्याद दिली आहे. मृत सुधीर कांदे हा गावोगावी आयुर्वेदिक जडीबुटी औषधे विकत होता. या गुन्ह्याचा तपास विभागीय पोलिस अधिकारी शिर्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक वाघ करीत हा खून का आणि कशासाठी केला याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे.
Web Title: Murder of a young man by stabbing him with a sharp weapon
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App