अहमदनगर: दारू पिले अन दोघांत भांडण कामगाराच्या खुनाचा उलगडा
Ahmednagar News: परप्रांतीय कामगाराच्या खुनाचा (Murder) उलगडा करण्यात पोलिसांना अवघ्या चोवीस तासांत यश.
अहमदनगर : एमआयडीसी परिसरात गुरुवारी (दि.७) सकाळी उघडकीस आलेल्या परप्रांतीय कामगाराच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना अवघ्या चोवीस तासांत यश आले असून, खून करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना एमआयडीसी पोलिसांनी तपोवन रोडवर पाठलाग करुन पकडले आहे.
विश्वास नामदेव गायकवाड (वय २४, रा. श्रीस्टाईल चौक, एमआयडीसी), अक्षय उर्फ शंभो प्रकाश सकट (वय २३, रा. पिंपळगाव कौडा ता.नगर), राहुल अशोक धोत्रे (वय २६, रा बजाजनगर, छत्रपती संभाजीनगर) असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.
एमआयडीसी परिसरात गुरुवारी (दि.७) सकाळी ८.३० च्या सुमारास प्लॉट नंबर एफ ७१ चे पाठीमागे मोकळ्या जागेत एका इसमाचा मृतदेह आढळून आला होता. ओमप्रकाश रामबच्चन महतो (वय ३५, रा. शिवालय कंपनी, दत्त मंदिरासमोर, एमआयडीसी, मूळ रा. बिहार) याचा असल्याचे समोर आले होते. मयताची पत्नी दुर्गादेवी ओमप्रकाश महतो हिने दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हयाचा तपास करत असतांना स.पो.नि. राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की, सदर खून हा आरोपी विश्वास गायकवाड व अक्षय उर्फ शंभो सकट यांनी केला असुन ते छत्रपती संभाजीनगरकडुन नगरच्या दिशेने येत आहेत. त्यावरुन स.पो.नि. सानप यांनी पोलिस पथकासह तपोवन रोडवर पडक्या महालाजवळ सापव्य लावला. त्यावेळी आरोपी हे विना नंबरच्या स्कुटीवर येत असतांना ते पोलिसांना पाहुन पळुन जावु लागले. पोलिसांनी सदर आरोपींचा पाठलाग करुन त्यांना पकडले. आरोपींना पोलिस स्टेशनला घेवुन येवुन त्यांना सदर गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्यांनी सांगीतले मयत ओमप्रकाश महतो याचे व आमचे दारु पिवून भांडण झाले होते. या भांडणात आम्ही त्याचे डोक्यात लाकडी दांडके मारुन त्याला जिवंत ठार मारले असे सांगुन सदर गुन्हयाची कबुली दिली आहे. सदरचे तीनही आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन, त्यांच्याविरुदध विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई स.पो. नि. राजेंद्र सानप, पो.हे.कॉ. नंदकुमार सांगळे, नितीन उगलमुगले, पो.ना. साबीर शेख, विष्णु भागवत, राजु सुद्रिक, महेश बोरुडे, संतोष नेहुल, पो.कॉ. किशोर जाधव, नवनाथ दहिफळे, सचिन हरदास चालक पो.हे.कॉ. गिरवले, तसेच मोबाईल सेलचे पो.कॉ. राहुल गुंड्डु, नितीन शिंदे, महिला पो.कॉ. ज्योती काळे यांचे पथकाने केली आहे.
Web Title: murder of a worker due to a quarrel between two drunk people
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App