अहमदनगर: परप्रांतीय महिलेचा खून; पोलिसांचे पथक रवाना
Ahmednagar Murder: रेल्वे स्टेशन परिसरात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला.
अहमदनगर: येथील इंगळे वस्ती -परिसरात मृतदेह आढळून आलेली महिला छत्तीसगडयेथील असल्याचा पोलिसांचा संशय आहे. कोतवाली पोलिसांचे एक पथक शुक्रवारी छत्तीसगडला रवाना झाले असून, सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी रेल्वे स्टेशन प्रशासनालाही पत्र देण्यात आले आहे.
रेल्वे स्टेशन परिसरात मंगळवारी (दि. २९) अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षकांसह पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी तपास केला असता महिलेची ओळख पटू शकली नाही. महिलेचे वय ३० ते ३५ वर्षे असावे, असा पोलिसांना अंदाज आहे. मृतदेहाशेजारी पोलिसांना एक डायरी सापडली होती. या डायरीमध्ये कोरबा छत्तीसगड, असे लिहिलेले होते. यावरून मृत महिला छत्तीसगडची असावी, असा पोलिसांचा संशय आहे.
Business Idea | कार मधून कसे पैसे कमवतात | Car Business Earn Money
जिल्हा रुग्णालयाकडून अद्याप शवविच्छेदनाचा अहवालही प्राप्त झालेला नाही. या महिलेबाबत परिसरात विचारणा करण्यात येत असून, तपासकामी पोलिसांचे एक पथक छत्तीसगडला रवाना झाले आहे. महिलेची ओळख पटल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
Web Title: Murder of a migrant woman
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App