Home नांदेड खळबळजनक!  ५० लाखांची खंडणी न दिल्याने बालकाची  हत्या,  अपहरण करून हातपाय बांधून…..

खळबळजनक!  ५० लाखांची खंडणी न दिल्याने बालकाची  हत्या,  अपहरण करून हातपाय बांधून…..

५० लाखांची खंडणी न दिल्याने १४ वर्षीय बालकाची हत्या (Murder) झाल्याची धक्कादायक घटना, खून करून मृतदेह तलावात फेकला.

Murder of a child for non-payment of ransom of 50 lakhs

नांदेड:  नांदेडमध्ये ५० लाखांची खंडणी न दिल्याने १४ वर्षीय बालकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथील तलावात बालकाचा मृतदेह आढळून आला आहे. परमेश्वर प्रकाश बोबडे असं मयत  बालकाचं नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, 14 वर्षीय परमेश्वर हा परभणीचा आहे. परमेश्वरचे परभणी शहरातील कृषिसारथी भागातून अपहरण झाले होते. परमेश्वर हा गुरूकूल निवासी शाळेत इयत्ता नववीत होता. ७ सप्टेंबर रोजी पेपर देऊन घरी जात असताना त्याचं अज्ञात आरोपींनी अपहरण केलं.

याची माहिती त्याच्या पालकांना मिळताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. परमेश्वरच्या पालकांनी वा मोंढा पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंद केला.

पोलिसांनी गुन्हा नोंद केल्यानंतर तपासाला सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. यानंतर या आरोपींनी गुन्हा कबूल केला. त्यांनी परमेश्वरचे हातपाय बांधून तलावात फेकल्याचे सांगितलं. या अपहरणकर्त्यांनी परमेश्वरच्या वडिलांकडून 50 लाख रुपयाची खंडणी मागितली होती.

‘५० लाख रुपये दे अन्यथा तुझ्या मुलाला जीवे मारू, अशी धमकी परमेश्वर याच्या वडिलांना देण्यात आली होती. या घटनेची माहिती परमेश्वर याचे वडील प्रकाश बोबडे यांनी परभणी येथील नवा मोंढा पोलीस ठाण्यात दिली होती. या घटनेने नांदेड आणि परभणी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

परमेश्वरच्या वडिलांनी खंडणी न दिल्याने अपहरणकर्त्यांनी परमेश्वरचा खून करून नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथील तलावात फेकून दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी  अधिक तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Murder of a child for non-payment of ransom of 50 lakhs

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here