Home बीड १७ वर्षीय मुलीची हत्या; पोलिसांना अत्याचाराचा संशय

१७ वर्षीय मुलीची हत्या; पोलिसांना अत्याचाराचा संशय

Breaking News | Beed Crime:  १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना.

Murder of 17-year-old girl Police suspect torture

बीड: बीडपासून जवळच असणाऱ्या घोसापूर्वी शिवारामध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अत्याचार करून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. अश्विनी (वय १७) असं हत्या झालेल्या मुलीचं नाव आहे. होळीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी 2 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. यातील एकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. तर उर्वरीत 2 आरोपी फरार झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आश्विनीची हत्या तिच्या मामाच्या मुलासह नातेवाईकातील मुलांनीच केली आहे.

दरम्यान पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला असून काही वेळात अत्याचार झालाय की नाही? याबाबत स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेनं संपूर्ण बीड जिल्हा हादरला असून घटनेवर संताप व्यक्त होत आहे.

Web Title: Murder of 17-year-old girl Police suspect torture

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here