पोटच्या मुलाचे तुकडे तुकडे करणाऱ्या क्रूर मातेला जन्मठेप
अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने मुलाची हत्या (Murder).
अमळनेर | जळगाव: महिलेचे भाच्याशी असलेले अनैतिक संबंध – तिच्या मुलाने पाहिले. त्यामुळे तुकडे तुकडे करून मुलाचाच खून करण्यात आला होता. याप्रकरणी महिला व तिच्या भाच्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमळनेर जिल्हा सत्र न्यायाधीश पी. आर. चौधरी यांनी शुक्रवारी हा निकाल दिला.
गीताबाई दगडू पाटील (३५) व तिचा भाचा समाधान विलास पाटील (२५, दोघे रा. चहार्डी, ता. चोपडा) अशी शिक्षा झालेल्या मामी व भाचा यांची तर मंगेश दगडू पाटील (१३) असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना २ फेब्रुवारी २०१९ रोजी घडली होती.
गीताबाई व समाधान यांचे अनैतिक संबंध होते. मंगेशने ही बाब वडिलांना सांगेल, असे सांगितले. दि. २ रोजी गीताबाईने त्याच्या डोक्यात काठीने तीन- चार वार केले. तो बेशुद्ध झाला. समाधानने त्याच्या तोंडात बोळा कोंबून त्याला गोणीत घातले. रात्री गीताबाई समाधानच्या घरी आली. तेथे दोघांनी त्याच्या शरीराचे कुन्हाड, चाकू व विळ्याने तुकडे तुकडे केले व गोणीत भरून त्याची विल्हेवाट लावली. पोलिसांनी २६ रोजी गीताबाई व समाधान यांना अटक केली होती.
Web Title: Murder Life imprisonment for cruel mother who dismembered her unborn child
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App