प्रेम प्रकरणातून हत्या, महाविद्यालयीन युवकावर कोयत्याने वार करत खून
Pune Crime: २१ वर्षीय तरुणाची कोयत्याने वार करून हत्या (Murder) केल्याची घटना.
पुणे: पुणे शहर व परिसर एका २१ वर्षीय तरुणाच्या हत्याकांडने हादरले आहे. पुण्यात २१ वर्षीय तरुणाची कोयत्याने वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे.
महेश डोके असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. सदर हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हा युवक बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. दरम्यान आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी बकोरी रोड वाघोली येथे एका 21 वर्षीय मुलावर कोयत्याने वार करण्यात आले. जखमी झालेल्या तरूणाला त्यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याच्या प्रकृतीची परिस्थिती पाहून त्याला ससून रुग्णालयात पाठवण्यात आले. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. सदर युवक हा बीजीएस कॉलेज वाघोली येथे बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिकत होता व वाढेबोलाही येथे एका होस्टेलमध्ये राहत होता
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, तपासा दरम्यान समोर आलेल्या बाबीनुसार ही हत्या समलैंगिक संबंधातून झाल्याचा दाट संशय आहे. परंतु नेमक्या कारणाचा अजूनही पोलीस शोध घेत आहेत. आरोपीच्या शोध घेण्यासाठी दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Murder due to love affair, college youth stabbed to death
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App