Home अहमदनगर एकाची गोळी झाडून हत्या केल्याचा पोलिसांचा संशय, तिघे जण ताब्यात

एकाची गोळी झाडून हत्या केल्याचा पोलिसांचा संशय, तिघे जण ताब्यात

Murder Case Police suspect one was shot dead

श्रीगोंदा | Murder Case Suspect: श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे बेलवंडी शिरूर रस्त्यालगत कुकडी कॉलनी बसथांब्याजवळ मृतदेह आढळून आला. पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील पांडुरंग जयवंत पवार वय ५२ असे त्या व्यक्तीचे नाव आहे.

डोक्यात असलेल्या जखमेवरून गोळीबार केल्याने पांडुरंग पवार यांची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी पिंपळनेर येथील तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

पांडुरंग पवार यांचा गोळी झाडून हत्या करण्यात आली आणि हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह शनिवारी रात्री देवदैठण गावाजवळ आणून टाकण्यात आला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेहाची ओळख मयताचा मुलगा सागर पवार यांना पटली आहे.

राजेंद्र जयवंत कौठाळे व अमोल कौठाळे यांनी सकाळच्या वेळी मृतदेह पाहिला आणि बेलवंडी पोलिसांना संपर्क केला. पवार यांच्या कपाळावरून पाठीमागे आरपार जाणारी मोठी जखम आढळून आली. गोळीबार करून खून केल्याचा संशय व्यक्त होत आहे. मात्र ही हत्या कोणी, कशासाठी, कुठे केली हे आरोपी जेरबंद झाल्यानंतरच उघड होणार आहे.

घटनेची माहिती समजताच अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, कर्जत पोलीस उप अधीक्षक अण्णासाहेब जाधव बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे, पोलीस हवालदार कैलास शिपणकर हे घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला तपासाची सूत्रे हलविली आहे.

Web Title: Murder Case Police suspect one was shot dead

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here