Home क्राईम नवविवाहित सासरवाडीत शेतात फिरायला गेला होता, अज्ञातांनी काढला काटा

नवविवाहित सासरवाडीत शेतात फिरायला गेला होता, अज्ञातांनी काढला काटा

Pune Crime:  सासरवाडीत आलेल्या जावयाची अज्ञात आरोपींनी हत्या (Murder) केल्याची घटना, तपासात धक्कादायक उघडकीस.

Murder Case newlyweds went for a walk in the fields at the in-laws' house, when the stranger pulled a thorn

पुणे: पुण्याच्या मावळमधील गहुंजे येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. सुट्टीच्या दिवशी सासरवाडीत आलेल्या जावयाची अज्ञात आरोपींनी हत्या केल्याची घटना घडली. मात्र या हत्याकांडाला आता वेगळे वळण लागले आहे. हत्याकांडाचा तपास सुरु केल्यानंतर तपासात जे उघड झाले ते पाहून पोलीसही चक्रावले. वारंवार होत असलेला शारीरिक छळ, मारहाण याला कंटाळून पत्नीनेच पतीची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. तपासानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ही माहिती दिली. याप्रकरणी हत्या झालेल्या सुरजच्या पत्नीला तळेगाव पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अगोदर पतीला अज्ञात तीन ते चार जणांनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचा बनाव पत्नीने रचला होता. परंतु, पोलिसांपुढे हा बनाव जास्त काळ टिकू शकला नाही. अखेर तिने आपला गुन्हा कबूल करत स्वतः हत्या केल्याचे पोलिसांकडे मान्य केले. विशेष म्हणजे दोघांचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. मयत सूरज हा एका कॉलेजमध्ये काम करत होता.

लग्नानंतर सूरज पत्नीचा शारीरिक छळ करायचा, तिला मारहाण करायचा, असा पत्नीचा आरोप आहे. या त्रासाला कंटाळून पत्नीने पतीचा काटा काढण्याचा कट आखला. त्यानुसार सुट्टीअसल्याने रविवारी सूरज सासरवाडीत आला असता पत्नी त्याला सोबत घेऊन फिरायला गेली. मग तेथून शेतात घेऊन गेली. तिथे आरोपी आधीच दबा धरुन बसले होते. तेथे आरोपींनी त्याला गाठले आणि त्याच्यावर हल्ला करत त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे.

Web Title: Murder Case newlyweds went for a walk in the fields at the in-laws’ house, when the stranger pulled a thorn

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here