Home अहमदनगर गाढ झोपेत असलेल्या पत्नीच्या पोटात पहारीने भोसकून निर्घृण हत्या, पतीने केलं भयंकर...

गाढ झोपेत असलेल्या पत्नीच्या पोटात पहारीने भोसकून निर्घृण हत्या, पतीने केलं भयंकर कृत्य

Ahmednagar Murder News:  दारूच्या नशेत असलेल्या पतीने गाढ झोपेत असलेल्या आपल्या पत्नीचा लोखंडी पहारीने डोक्यावर मारून व पोटात भोकसून खून केल्याची घटना.

Murder Case guard stabs his wife in the stomach while she is fast asleep

राहुरी: राहुरी तालुक्यातील डिग्रस येथे दारूच्या नशेत असलेल्या पतीने गाढ झोपेत असलेल्या आपल्या पत्नीचा लोखंडी पहारीने डोक्यावर मारून व पोटात भोकसून खून केल्याची घटना शनिवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून या घटनेमुळे तणाव निर्माण झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, अनिता सुरेश पवार (वय ३७) ही महिला झोपेत असताना तिचा पती सुरेश भानुदास पवार याने जमिनीवर खड्डे घेण्यासाठी वापरत असलेल्या पहारीने तिच्या डोक्यावर वार करून नंतर पोटात भोकसून खून केला. आपल्या आईच्या किंचाळण्याचा आवाज आल्याने शेजारी झोपलेले ७ वर्षाची मुलगी व ५ वर्षाच्या मुलाने आरडाओरड केल्याने शेजारी धावत आले.

अनिता ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून काही शेजाऱ्यांनी धाडस करून नशेत धुंद असलेल्या सुरेश याला पकडून बांधून ठेवले. त्यानंतर या घटनेबाबत राहुरी पोलीसांना माहिती देण्यात आली. राहुरी पोलीस तात्काळ घटनास्थळी हजर होऊन सुरेश याला ताब्यात घेतले. अनिता हिचा मृतदेह राहुरी ग्रामिण रुग्णालयात पाठविण्यात आला.

Web Title: Murder Case guard stabs his wife in the stomach while she is fast asleep

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here