Home अहमदनगर शिर्डीच्या अभियंत्याचा झुडपात सापडला मृतदेह

शिर्डीच्या अभियंत्याचा झुडपात सापडला मृतदेह

Ahmednagar News | Shirdi: शिर्डीच्या तरुणाचा पुणे- नाशिक मार्गावरील खेड घाटात खून (Murder) झाल्याने खळबळ उडाली.

Murder Case Body of Shirdi engineer found in bush

शिर्डी : पुणे येथील आयटी कंपनीत काम करणाऱ्या शिर्डीच्या तरुणाचा पुणे- नाशिक मार्गावरील खेड घाटात खून झाल्याने खळबळ उडाली आहे.

सौरभ नंदलाल पाटील (वय २३) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सौरभचे शिक्षण शिर्डीतील आदर्श शाळेत झाले असून त्याचे वडीलदेखील आदर्श माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत. एमटेकच्या दुसऱ्या वर्षात शिकणारा सौरभ पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये अभियंता म्हणून कामाला होता. २८ जुलैपासून तो बेपत्ता होता.

सौरभचे नातेवाईक संदीप सोनवणे यांनी हिंजवडी पोलिसात हरवल्याची तक्रार दिली होती. त्याची दुचाकी खेड तालुक्यातील होलेवाडी परिसरात तर गाडीची चावी विहिरीच्या कठड्यावर आढळली होती. त्यामुळे परिसरात त्याचा शोध घेण्यात आला होता. मात्र, तो सापडला नाही. अखेर रविवारी त्याचा मृतदेह खेड घाटात सांडभोरवाडी येथील वनविभागाच्या हद्दीत डोंगर उतारावर झाडाझुडपात कुजलेल्या अवस्थेत सापडला. सहायक पोलिस निरीक्षक बिरुदेव काबुगडे यांच्या फिर्यादीवरुन खेड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस पुढील तपास करत आहेत. सौरभ दीड महिन्यापूर्वीच नोकरीस लागला होता. तो नोकरी करून एम.टेकच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होता. त्याच्या पश्चात आई, वडील व लहान भाऊ असा परिवार आहे. संग्राम कोते यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या घटनेची माहिती दिली, पवार यांच्या कार्यालयाने पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांना चौकशीच्या सूचना दिल्या आहेत.

Web Title: Murder Case Body of Shirdi engineer found in bush

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here