Murder: शहरात भरदिवसा कुऱ्हाडीने वार करून खून
Baramati Murder News: भरदिवसा बारामती शहरात कुऱ्हाडीने वार करून एका इसमाचा खून केल्याची धक्कादायक घडली आहे.
बारामती: भरदिवसा बारामती शहरात कुऱ्हाडीने वार करून एका इसमाचा खून केल्याची धक्कादायक घडली आहे. गुरुवारी ही घटना घडली. बारामती शहरात भरदिवसा ५० वर्षीय इसमाचा खून झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. कुऱ्हाडीने वार करून या इसमाचा खून करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी सांगितले.
पोलीस तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हा प्रकार सायंकाळी ६ च्या सुमारास घडला आहे.. शशिकांत कारंडे असे खून झालेल्या व्यक्तिचे नाव आहे. पोलिसांनी तातडीने शोध सुरु केला आहे. कारंडे हे त्यांच्या नातवाला नेण्यासाठी कविवर्य मोरोपंत शाळेत आले होते. याच दरम्यान हा प्रकार घडल्याचे समजते.
कारंडे यांच्या मुलांची पुर्वी भांडणे झाली होती. त्यातूनच हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. मात्र, पकडून याबाबत दुजोरा मिळू शकलेला नाही. कारंडे हे बारामती लघु औद्योगिक वसाहतीत एका पाईप कंपनीत नोकरीला आहेत.
Web Title: Murder by an ax in broad daylight in the city