Home नाशिक मनपाचा मुकादम एसीबीच्या जाळ्यात!

मनपाचा मुकादम एसीबीच्या जाळ्यात!

Nashik: अनधिकृत बांधकामावरील कारवाईसाठी लाच (bribe) घेताना मालेगाव मनपाच्या बिट मुकादमास रंगेहाथ पकडण्यात आले.

Municipality's lawsuit in ACB's Bribe Case

नाशिक : नाशिक जिल्ह्यात लाचेच्या घटना वारंवार घडत आहेत. यातच आता मालेगाव येथील एका प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या अनधिकृत बांधकामावरील कारवाईसाठी लाच घेताना मालेगाव मनपाच्या बिट मुकादमास गुरुवारी (दि. २) रंगेहाथ पकडण्यात आले. मनोहर ढिवरे असे संशयित मुकादमाचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मालेगाव महानगरपालिकेत केलेल्या अर्जानुसार वरिष्ठांना प्रस्ताव सादर करण्यासाठी व अनधिकृत

याबाबत अधिक माहिती अशी की, अतिक्रमण कारवाई टाळण्यासाठी स्वीकारली करण्यासाठी पाच हजारांची लाच संशयित मनोहर बांधकामावर कारवाई ढिवरे यांनी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची लाच मागितली. मात्र, तडजोडीअंती पाच हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.

याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केल्याने एसीबीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराची खातरजमा करून संशयित ढिवरे याला लाचेची पाच हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना पंच व साक्षीदारां समक्ष रंगेहाथ पकडले. याप्रकरणी संशयित ढिवरे यांच्या विरोधात सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस निरीक्षक नाना सूर्यवंशी यांच्या पथकातील पोलीस हवालदार सचिन गोसावी, शरद हेंबाडे, पोलीस नाईक विलास निकम, चालक पोलीस नाईक परशुराम जाधव यांनी ही कारवाई केल्याची माहिती वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांनी दिली.

Web Title: Municipality’s lawsuit in ACB’s Bribe Case

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here