Breaking News | Ahmednagr: मुसळधार पावसामुळे मुळा नदीला पूर, पारनेर तालुक्याचा राहुरी-संगमनेरशी संपर्क तुटला.
पारनेर : अकोले तालुक्यातील मुसळधार पावसामुळे मुळा नदीला पूर आला आहे. रविवारी दुपारी ४:३० वाजता पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्द येथील पूल पाण्याखाली गेला. परिणामी, पारनेरचा राहुरी आणि संगमनेर तालुक्याशी संपर्क तुटला होता. पुरामुळे प्रामुख्याने मांडवे खुर्द व देसवडे दोन गावांमधील काही शेती व भागामध्ये पाणी घुसले होते. अकोले तालुक्यात मुळा नदीच्या
पाणलोट क्षेत्रात रविवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे पाणी पातळीत वाढ होऊन मुळा नदीला पूर आला होता; परंतु या पारनेर- संगमनेर तालुक्याला जोडणारा मांडवे- साकुर पुलावरून पाणी गेले. त्यामुळे सायंकाळपर्यंत वाहतूक बंद होती. रविवारी रात्री उशिरापर्यंत मुळा नदीचे पाणी कमी झाले नव्हते. पाण्याने धोक्याची पातळी ओलांडल्याने परिसरातील गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
८ ते १० दिवसांपूर्वी अकोले तालुक्यातील संततधार पावसामुळे पारनेर-संगमनेरला र्जाडणाऱ्या पुलाला पाणी लागले होते. मुळा नदीला पूर आल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला होता; परंतु रविवारी पुन्हा दुपारी ४:३० वाजता मुळा नदीला पूर आल्याने संगमनेर-पारनेर तालुक्याला जोडणारा पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली होती.
Web Title: Mula River floods Water from this bridge
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study