Home महाराष्ट्र आईने सांगितले कुलर लाव अन… माय लेकांचा मृत्यू

आईने सांगितले कुलर लाव अन… माय लेकांचा मृत्यू

कुलरचा शॉक (Electric Shock) लागून मायलेकाचा मृत्यू झाल्याची घटना.

mother said the death of the cooler lava and my daughter electric shock

आर्णी  | यवतमाळ : कुलरचा शॉक लागून मायलेकाचा मृत्यू झाल्याची घटना दाभडी येथे मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. वाढत्या उकाड्याचे हे दोघे बळी ठरले. वनिता सुनील राठोड (३५) कुणाल सुनील राठोड (२) रा. दाभडी. ता. आणी, अशी मृतांची नावे आहेत.

वनिता या सायंकाळी शेतातून घरी आल्या. त्यावेळी त्यांनी मुलगा कुणाल याला कुलर लावण्यात सांगितले. बटण सुरू करताच कुणालला शॉक लागला. त्याचवेळी त्याच्या अंगावर कुलर पडला. हा प्रकार लक्षात येताच वनिता कुलर उचलण्यासाठी गेल्या. त्यांनाही शॉक लागला. घर मातीचे असल्याने कुलरच्या पाण्यामुळे जमिनीला ओल आली होती. त्यामुळे कुलर सुरू करण्यासाठी गेलेल्या चिमुकल्या कुणाल याला शॉक लागल्याचे सांगितले जाते. शॉक लागून पडलेल्या दोघांना गावातील गणेश राठोड याच्या वाहनाने आर्णी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले  मात्र त्यांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: mother said the death of the cooler lava and my daughter electric shock

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here