Murder: अल्पवयीन मुलीच्या आईचा भोसकून खून
Murder Case: छेडछाड जाब विचारल्याने मुलीच्या आईचा भोसकून खून बाप लेकास अटक.
अंबाजोगाई (जि. बीड): परळी तालुक्यातील वानटाकळी तांडा येथील अल्पवयीन मुलीला छेडछाड करून त्रास दिल्याचा जाब विचारल्याने मुलीच्या आईचा तीक्ष्ण हत्याराने भोसकून खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
परळी तालुक्यातील मौजे वानटाकळी तांडा येथील अनिता राठोड व वैजनाथ राठोड हे कुटुंब दिवसांपूर्वी बालाजी देवदर्शनाला गेले होते. त्यांच्या तीन मुली काळवटी तांडा येथे वास्तव्यास होत्या. याच तांड्यावरील बबन चव्हाण हा त्यांच्या अल्पवयीन मुलीची विनाकारण छेडछाड करीत कहाण होता. आई-वडील देवदर्शनावरून परत आल्यानंतर होत असलेला प्रकार सदरील अल्पवयीन मुलीने त्यांना सांगितला. आई-वडिलांनी दोन दिवसांपूर्वी बबन चव्हाण यास जाब विचारला. याचा राग मनात धरून मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास बबन चव्हाण, त्याचे वडील राजेभाऊ चव्हाण, भाऊ सचिन चव्हाण व इतर तिघांनी राठोड कुटुंबीयांच्या घरी जाऊन भांडण करण्यास सुरुवात केली. वैजनाथ राठोड यास मारहाण होऊ नये म्हणून त्यांच्या नातेवाइकांनी त्यास रूममध्ये कोंडून दरवाजा लावून घेतला. त्यावेळी आरोपींनी दुसऱ्या रूममध्ये असलेल्या अनिता राठोड यांच्याकडे मोर्चा वळवून त्यांच्या पोटात तीक्ष्ण हत्यारांनी वार केला. यात त्या जखमी झाल्या. गंभीर अवस्थेतील अनिता याना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
Web Title: Mother of minor girl stabbed to Murder death