धावत्या बसमध्ये जावयाची हत्या, सासू – सासऱ्याला अटक
Breaking News | Kolhapur Crime: सासू-सासर्याने चालत्या बसमध्ये जावयाची त्याच्याच पॅंटीच्या नाडीने गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार.
कोल्हापूर: दारू पिऊन मुलीला मारहाण करत असल्याने सासू-सासर्याने चालत्या बसमध्ये जावयाची त्याच्याच पॅंटीच्या नाडीने गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात उघडकीस आली आहे.
खून केल्यानंतर त्याचा मृतदेह मध्यवर्ती बस स्थानक परिसरात टाकून पसार झालेल्या सासु-सासर्यांना पोलिसांनी तांत्रिक तपास करत अव्यघ्या काही तासांत ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांनी दिलेल्या कबुलीजबाबत हा धक्कादायक प्रकार पुढे आला. या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे.
कोल्हापूरच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. नेहमी गजबजलेल्या बस स्टँडवर मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात संदीप शिरगावे याचा हा मृतदेह असल्याची ओळख पटली मात्र त्याच्या मानेवर जखमेचे व्रण असल्याने त्याचे गूढ अधिकच वाढले. त्यामुळे हेच गूढ उकलण्याचे काम पोलिसांनी सूरु केले.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत संदीपला दारूचे व्यसन होते आणि त्यातून बायकोशी त्याचे सतत भांडण होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र त्याचा नेमका खून कोणी केला याचे गूढ मात्र अद्यापही उलगडत नव्हते. याच दरम्यान पोलिसांना बसस्थानाकावरचे सीसीटीव्ही हाती लागले. यामध्ये एक जोडपे मृत्यूदेह घेऊन जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.
आपल्या मुलीला त्रास देत असल्याने जावयाचा सासू सासऱ्यानेच काटा काढला. गडहिंग्लजमध्ये बायकोच्या माहेरी जाऊन धिंगाणा घालणाऱ्या संदीपला एसटी बसमधून सासू सासरे कोल्हापूरला सोडायला निघाले. विनावाहक बसमध्ये यावेळी गर्दी कमी होती तर चालक बस चालवण्यात गुंग होता याच वेळी जावयाचा चालत्या बसमध्येच सासू सासऱ्यानी गळा आवळून काटा काढला. आणि मृतदेह बस कोल्हापुरात येताच स्टँड वर ठेऊन पोबारा केला. मात्र हे दोघे पोलिसांच्या हातून सुटले नाहीत. अवघ्या काही तासातच पोलिसांनी याचा छडा लावला आणि या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
Web Title: Mother-in-law killed in running bus, mother-in-law arrested
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study