आईची आठ महिन्याच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
जामखेड: शहरातील चुंबळी येथील विवाहित महिलेने आठ महिन्याच्या मुलाला घेऊन विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत जामखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
घरगुती वादातून आत्महत्या केल्याची पोलिसांचे म्हणणे आहे. राधा ईश्वर हुलगडे वय २२ हिने आठ महिन्याच्या रामा मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. घरगुती वादाच्या रागातून मंगळवारी सकाळी ११ वाजता ही घटना घडली.
चुंबळी येथील ईश्वर हुलगडे याचा पाथर्डी तालुक्यातील खोपटी गावातील राधा हिच्याबरोबर दोन वर्षापूर्वी विवाह झाला होता. त्यांना रामा नावाचा आठ महिन्याचा मुलगा आहे.
याप्रकरणी पिडीत मुलीचे सासरे बारीकराव हुलगडे यांनी जामखेड पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन राधा आणि मुलगा राम याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. मयत मुलीच्या नातेवाइकांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी ग्वाही दिल्यानंतर रात्री आठ वाजता मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.
Web Title: Mother commits suicide by jumping into a well